अप्पर डिप्पर प्रीमियर लीगचे थाटत उदघाट्न upper dipparगडचिरोली :- अप्पर डिप्पर ग्रुपच्या वतीने प्रीमियर लीग व करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चांदाळा मार्गांवरील गोटूलभूमी मैदानावर आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेचे उदघाट्न शनिवार 14 जानेवारीला गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष पदी डॉ यशवंत दुर्गे तर धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, नंदकिशोर काथवटे, अविनाश भांडेकर, अनिल धामोडे, नपचे उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, बलराम सोमनानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अप्पर डिप्पर प्रीमियर लीग मध्ये गुरवळा सफारी, मुतनूर मॅजिक, भंडारेश्वर फोर्ट आणि चपराळा फारेस्ट संघ आपसात झुंज देणार आहेत तर करंडक स्पर्धेत गडचिरोली सह एकूण 48 संघांनी सहभाग नोंदवीला आहे 25 जानेवारीला स्पर्धेचे समारोप कारण्यात येणार असून विजेत्या संघाना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments