तोंड चालाकी करणाऱ्या शासनाचा जाहीर धिक्कार करीत हजारो अंगणवाडी महिला रस्त्यावर anganwadi
गडचिरोली : अंगणवाडी महिला आपल्या न्याय संगत मागण्याकरीता गेल्या चार महिण्यापासून सतत संघर्ष करीत आहे. या चार महिण्याचे काळात बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास सतत आश्वासने दिली. प्रश्नांची सोडवणुक करण्यात येईल असे वेळोवेळी आश्वासने दिली. मुख्यमंत्री म्हणाले दिवाळीपूर्वी मानधन वाढ घोषीत करण्यात येईल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणी बाल कल्याण मंत्री या त्रिकुटाने मानधन वाढीची घोषना २६ जानेवारीला करण्यात येईल. असे घोषीत केले होते. परंतु प्रत्येक्षात काहीही झाले नाही.

या नेत्यांनी तोंड चालाकी करुन वेळ निभावून नेली. याचे निषेधार्थ २० फरवरी पासून राज्यांतील दोन लाख अंगणवाडी महिलांनी बेमुदत संप पुकारला आहे. या निमित्ताने धरणा कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. दहीवडे म्हणाले शासनानेच संप करण्यास अंगणवाडी महिलांना भाग पाडले. दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली असती तर संप फुकारण्याची वेळ अंगणवाडी महिलांनवर आली नसती.

किशोर जामदार म्हणाले अंगणवाडी महिला पुर्णकालीन आहे. त्यांना ग्रॅज्युटी लागु आहे. असा महत्वपुर्ण निर्णय देशाचे सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरीता अंगणवाडी महिलांना रस्त्यावर उतरावे लागते ही फार मोठी शोकार्तीका आहे. राजेश पिंजरकर म्हणाले सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीनंतर सेविकेला एक लाख रुपये तर मदतनिसला ७५ हजार रुपये देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला.

झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरीता अंगणवाडी महिलांना मागणी करावी लागते, रस्त्यावर उतरावे लागते याची लाज आणी शरम या सरकारला नाही. प्रमोद गोडघाटे म्हणाले एकजुटीच्या बळावर आपण ही लढाई जिंकू या विश्वासाने लढण्याची तयारी आपण ठेवली पाहीजे. अमोल मारकवार, रामदासजी जराते, जयश्री वेलदा, हेमंत डोलीकर, राजु सातपुते, विठ्ठल प्रधान यांनी देखिल अंगणवाडी महिलांना मार्गदर्शन केले. ललीता केदार यांचे नेतृत्वात मुख्यकार्यपालन अधिकारी यांना भेटले व मागण्याचे निवेदन सादर केले.

धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता, भारती रामटेके, छाया कागदेलवार, सुमन तोकलवार, विठाबाई भट, संगीता वडलाकोंडावार, उर्मीला गव्हारे, सरीता आत्राम, कौशल्या गौरकार, माया नैनुरवार, यांनी विशेष परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments