चामोर्शी : येथील नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची मुदत संपल्यामुळे आज 20 फेब्रुवारीला विषय समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्याकरिता नगर पंचायतच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात काँग्रेसला राष्ट्रवादीची व भाजपची साथ मिळाल्याने या सभेत विषय समितीच्या सर्व सभापतींची अविरोध निवड करण्यात आली.
मागील वर्षी 21 फेब्रुवारी 2022 रोजी नगर पंचायतच्या विषय समितीची निवडणूक घेण्यात आली होती. सर्व चार सभापतींची निवड अविरोध झाली होती. त्यांची मुदत संपत आल्याने आज नपंच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय समितीतील बांधकाम, स्वच्छता, पाणी पुरवठा व महिला बालकल्याण या सभापती, उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक-एक नामांकन दाखल करण्यात आले. दुपारी 3 वाजता पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार राजू वैद्य, अधीक्षक मोरेश्वर पेंदाम, कर निरीक्षक भरत, अभियंता निखिल कारेकर, सभा लिपिक दिलीप लाडे आदींच्या उपस्थित पार पडलेल्या विशेष सभेत काँग्रेसचे नगरपंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे यांची दुसऱ्यांदा स्वच्छता, वैद्यक व आरोग्य सभापतीपदी तर बांधकाम सभापतीपदी काँग्रेसचे वैभव भिवापूरे यांची दुसऱ्यांदा, तर पाणी पुरवठा व जल निस्तारण सभापती म्हणून राष्ट्रवादीचे निशांत नैताम, महिला व बाल कल्याण सभापती म्हणून भाजपच्या गीता सोरते, महिला व बालकल्याण उपसभापतीपदी काँग्रेसच्या स्नेहा सातपुते यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, सोनाली पिपरे, सुमेध तुरे, गीता सोरते, स्नेहा सातपुते, वैभव भिवापुरे, नितीन वायलालवार, वर्षा भिवापूरे, प्रेमा आईंचवार, माधुरी व्याहाडकर, निशांत नैताम, काजल नैताम, वंदना गेडाम, रोशनी वरघटे, राहुल नैताम, स्वीकृत नगरसेवक लौकिक भिवापूरे, आशिष पिपरे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, माजी सभापती विजय शातलवार, राजेश ठाकूर, गुरुदास सातपुते, सिद्धार्थ सोरते, पुरण व्याहाडकर, पोषक गेडाम, विनोद पेशत्तीवार, तानाजी धोडरे, शुभम बनपुरकर, लक्ष्मण रामटेके, निक्कु झलके व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
नवनियुक्त सभापतींनी स्वीकारला कार्यभार
नवनिर्वाचित बांधकाम सभापती वैभव भिवापूरे, स्वच्छता, वैद्यक व आरोग्य सभापती चंद्रकांत बुरांडे, पाणीपुरवठा सभापती निशांत नैताम तर महिला व बालकल्याण सभापतीपदी गीता सोरते, उपसभापती स्नेहा सातपुते यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांचे अध्यक्ष जयश्री वायलावार व कार्यकर्ते तसेच कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
0 Comments