गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेला झिंगानूर परिसरात कोणत्याही सोयीसुविधा नसून जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागातील विविध समस्या सोडवाव्यात, अशी मागणी झिंगानूरच्या ग्रापं पदाधिकारी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
झिंगानूर परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी, वडदेली गावाजवळच्या जंगलात तलावाची निर्मिती करावी, मामा तलावाचे खोलीकरण करावे, रमेशगुडम ते झिंगानूर सिंचन योजना मंजूर करावी, झिंगानूर येथे बॅंकेची सुविधा उपलब्ध करावी, येथे मोबाईलचे नेटवर्क उपलब्ध करावे, विद्युत वितरणमार्फत सबस्टेशन मंजूर करावे, झिंगानूर ते सिरकोंडा यादरम्यान खंडी पहाडी नाला व नैगुंडाला पुलाचे बांधकाम करावे, रमेशगुडम ते झिंगानूर, झिंगानूर ते सोमनपल्ली, झिंगानूर ते अमुडेल्ली वाया सिरोंचा अपूर्ण रस्ता पूर्ण करावा, पांदण रस्त्यांची समस्या सोडवावी, झिंगानूर येथील नळ योजना सुरु करावी, शासन आपल्या दारी उपक्रम राबवावा, झिंगानूर प्राआ केंद्रात एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करावी, रिक्त पदे भरावीत, जिप शाळा, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करावे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा झिंगानूर येथे महाविद्यालय तसेच आयटीआय सुरु करावे, आश्रमशाळेसाठी जलकुंभ बांधावे, गडचिरोली ते झिंगानूर बससेवा सुरु करावी आदी मागण्यांचे निवेदन झिंगानूरचे सरपंच निलीमा मडावी, ग्रापं पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.
0 Comments