गडचिरोली : स्थानिक साईनगर कार्मेल शाळेच्या मागे येथील निकुंज प्रेमेंद्र सहारे यांची युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन डियरबन अमेरिका येथे एमएसइ (ऑटोमोटिव्ह अँड मोबिलिटी सिस्टीम) या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
निकुंज सहारे याचे दहावीपर्यंतचे शिक्षण स्थानिक कार्मेल शाळेमधून व 11 वी 12 वीचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथून पूर्ण केले आहे. त्याने सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वडगाव पुणे येथून बी. टेक पदवी प्राप्त केली आहे. तसेच जीआरई व टोफेल परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन अमेरिकाकडून निकुंज हा 20 लाख रुपयाचे शिष्यवृत्ती साठी पात्र ठरला आहे. उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.
0 Comments