हळदा येथील गौशाळेला मदत

 
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांचा पुढाकार


गडचिरोली ,: माँसाहेब मिनाताई ठाकरे यांची पुण्यतिथी दरवर्षी ‘सेवाभाव दिन’ म्हणून पाळला जातो. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसपंर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी माँसाहेबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हळदा येथील गोविंद गौशाळेला भेट देऊन गौशाळेला आर्थिक मदत दिली. 

याप्रसंगी अरविंद कात्रटवार म्हणाले, प्राचिन काळात गायीचा वापर विनीमय आणि देवाणघेवाणीचे साधन म्हणून केल्या जात असे. माणसाची समृद्धी त्याच्याकडे असलेल्या गायीच्या संख्येवरुन मोजली जात असे. गायीचे महत्व मानवी जीवनासाठी अनमोल असले तरी, आजच्या आधुनिक युगात तिचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे. त्यामुळे गौरक्षणासाठी आता गोपाळ पुढे आले पाहिजे. हळदा येथील गौशाळेने गौरक्षणासाठी उचललेले पाऊल प्रशंसनिय आहे. गौशाळेला ज्या ज्यावेळी मदत लागेल, त्यावेळी आम्ही सदैव तयार राहु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

सद्यस्थितीत सदर गौशाळेत 250 गौवंश आहेत. या गौशाळेत कसाईच्या तावडीतून जप्त केलेले गौवंश तसेच काही शेतकरी गौवंशाचे पालनपोषण करण्यासाठी असमर्थ असल्याने ते आपले गौवंश गौशाळेत आणून देतात.  

याप्रसंगी यादव लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, दिपक लाडे, अमित बानबले, संदिप भुरसे, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार यासह असंख्य शिवसैनिक व गौशाळा चालक व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments