पोस्कोअंतर्गत तरुण अटकेत- जिमलगट्टा येथील घटना

गडचिरोली : पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी रोहित बोंगिरवार (23) रा. जिमलगट्टा येथील तरुणास पोस्कोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. 
प्राप्त माहितीनुसार अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील रोहित बोंगरवार या आरोपीने पाच वर्षीय लहान बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याची तक्रार बालिकेच्या पालकांनी जिमलगट्टा पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीअंतर्गत कलम 376 नुसार 12/2003 अन्वये गुन्हाची नोंद करून आरोपी रोहित बोंगरिवार यास आज, मंगळवारी आरोपी रोहित यास पोलिसांनी अटक केली. मंगळवारी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदर घटनेचा पुढील तपास एसडीपीओ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण करीत आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी आलापल्ली निवासी एका डॉक्टरवर याच कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोक्सो अंतर्गत तालुक्यातील ही दुसरी घटना असल्याने अहेरी तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments