गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महेंद्र ब्राम्हणवाडे यांची मागणी


गडचिरोली : आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या लोडशेडींग शेतीला पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहे. यासोबतच जंगली हत्तींमुळे शेतीची प्रचंड नासधूस झाली आहे. यासोबत मेडीगड्डा धरणाच्या बॅक वॉटरमुळे जिल्ह्यातील भागात पुरस्थितीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना या संकटातून काढण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.

महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, अतिदुर्गम मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कुठलाही मोठा उद्योगधंदा नसल्याने जिल्ह्यातील अनेक नागरिक हे फक्त शेतीवर अवलंबून आहे. मात्र मागील वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले. या वर्षी तरी उत्पन्न चांगले होईल या आशेवर असेलेल्या अनेक शेतकरी बांधवाना निसर्गराजाने नाराज केले. या वर्षी झालेल्या पावसाच्या अनियमिततेणे धान आणि कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे जिल्ह्यात रेगडी येथील कन्नमवार जलाशय वगळता दुसरे कोणतेही मोठे सिंचनाचे माध्यम नाही, मात्र त्याचे पाणी ठराविकच भागात जात आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेल्या भारनियमनामुळे कृषीपंपाद्वारे शेतीला पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहे. तर जिथे पीक चांगले झाले तिथे जंगली हत्तींसह इतर वन्यप्राण्यांनी शेतीची नासधूस केली जात आहे. तर अनेक भागात मेडिगटा धरणाच्या बॅक वॉटरमुळे जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होऊन शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना या संकटातून काढण्याकरीता जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments