गडचिरोलीत नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळागडचिरोली : गडचिरोली येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पिठ नाणीज धाम यांच्या पादुका दर्शन, प्रवचन व सामाजिक उपक्रम कार्यक्रम 21 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे.

दरम्यान, सकाळी 8 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रा आरमोरी मार्गावरील राजूरकर यांच्या घरापासून ते इंदिरा गांधी चौकातून पटेल मंगल कार्यालय मार्गाने सरळ कार्यक्रम स्थळी जाणार आहे. त्यानंतर गुरुपूजन सोहळा होईल. त्याच्या पाठोपाठ सामाजिक उपक्रमात दुर्बल घटकासाठी 40 शिलाई मशीनचे वाटप मान्यवराच्या हस्ते होणार आहे.

 प्रवचन व उपासक दिक्षा होईल. पुष्पवृष्टीने सोहळ्याची सांगता होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती अध्यक्ष कृष्णराव झंजाळ, सुरेश सहारे, तालुका अध्यक्ष किशोर चिमुरकर, युवा सेना प्रमुख मदन राजूरकर, पितांबर कुकुडकर, धनंजय डोईजड, दिलीप दहेलकर, तारा वाघ, ऋषी गेडाम, अक्षय मांडवकर, कार्तिक वासेकर, प्रकाश चलाख, सुनील धात्रक, लीनाताई उईके, वैषाली जुवारे, अमोल धात्रक, मोहन पाल, राजेंद्र म्हशाखेत्री, सीताराम गुरनुले सहकार्य करीत आहेत. या कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज़िल्हाध्यक्ष दिवाकर मुके, ज़िल्हा निरीक्षक मेघराज निबुधे, सचिव प्रकाश कुनघाडकर, कर्नल सोमेश्वर पत्रे, महिला अध्यक्ष कविता चिळांगे, अध्यात्मिक प्रमुख विजय गडपायले, प्रसिद्धी प्रमुख गजानन झाडे, वैशाली तितीरमारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments