गोंडी भाषेचे स्वतंत्र अध्यासन केंद्र तयार करणार:कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे

 गोंडवाना विद्यापीठात सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन



गडचिरोली : गोंडी भाषा ही मराठी ,हिंदी ,इंग्रजी या भाषांसारखीच अतिशय समर्पक भाषा आहे.या भाषेत लोकगीत , संगीत आहे . या भाषेला आपलं  स्वतःच अस्तित्व आहे.  आपल्याला मराठी भाषेचा जसा  अभिमान आहे तसाच अभिमान गोंडी  समुदायाला त्यांच्या भाषेचा आहे.त्यामुळे या  भाषेचा अभ्यास करणे हे  विद्यापीठाचे दायित्व आहे. म्हणून नव्या शब्दांचे संकलन झाले पाहिजे . भाषेचे शुद्ध स्वरूप समोर आले पाहिजे . या भाषेचे संकलन करून गोंडी  भाषेचे स्वतंत्र केंद्र तयार करण्यार असे प्रतिपादन  गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

 गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्रातर्फे  दि. ८ जानेवारी  ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत 'गोंडी-माडिया शब्दसंग्रह आणि भाषा संहिताकरण 'या विषयावर सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे  उद्‌घाटन आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी व्यासपीठावर समाजसेवक देवाजी तोफा , सिनेट सदस्य रुपेंद्रकुमार गौर,भाषा तज्ञ छत्तीसगड येथील  शेरसिंग आतला , तेलंगणा येथील आरजु  सिडाम, समन्वयक सीजी नेट स्वरा सोसायटी शुभ्रान्शु चौधरी उपस्थित होते.


गोंडी - माडीया भाषेचे शब्दकोश संकलन याबाबत विस्तृत अंगाने 

छत्तीसगड येथील  सेरसिंग आतला , तेलंगणा येथील आरजु  सिडाम, समन्वयक सीजी नेट स्वरा सोसायटी शुभ्रान्शु चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम  यांनी संचालन पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या इंग्रजी विभागाच्या  द्वितीय वर्षाची विद्यार्थ्यांनी सोनाली मडावी हिने तर आभार या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी मानले. या कार्यशाळेला देशातील विविध भागातील गोंडी; माडीया भाषेचे अभ्यासक सहभागी झाले आहेत.या कार्यशाळेत देशभरातील विविध अभ्यासक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments