मा. खासदार डाॅ. अशाेकजी नेते यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी हाेणार साजरा

 


गडचिरोली : भाजपच्या अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा  वाढदिवस मंगळवार ( ता.१) जुलैला विविध सामाजिक उपक्रमांनी  साजरा केला जाणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता गडचिराेली येथील चामोर्शी रोड मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर  ८.३० वाजता सेमाना देवस्थान मंदिरात पूजाअर्चा करून देवस्थान परिसरात “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर महिला रूग्णालयात माणुसकीचा एक ध्यास अंतर्गत अन्नदान, फळवाटप करण्यात येणार आहे. चामोर्शी मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमात अन्न धान्याची कीट वाटप व मुरखळा येथील मूकबधीर विद्यालय व मतीमंद विद्यालयात  बुक, पेनचे वाटप असे विविध सेवाभावी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.  सायंकाळी ७ वाजता. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.

कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार  उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments