● गडचिरोली भागातील हा सर्वात जास्त वजनाच्या बाळाचा सामान्य प्रसूतीद्वारे झालेला जन्म असू शकतो
कोनसरी : गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता आणि आरोग्यसेवेतील उत्कृष्टता अधोरेखित करणाऱ्या घटनेत ४.६३ किलो वजनाचे बाळ रुग्णालयात सामान्य प्रसूतीद्वारे जन्मले. बाळ आणि आई दोघेही सुरक्षित आहेत. गडचिरोली भागातील हा सर्वात जास्त वजनाच्या बाळाचा सामान्य प्रसूतीद्वारे झालेला जन्म असू शकतो.
सामान्यत: ४ किलो आणि त्याहून अधिक वजनाची बाळे 'मोठी' मानली जातात. या प्रकरणात, बाळाचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथील सुंदर नगर येथील रहिवासी असलेल्या एका मधुमेह नसलेल्या आईच्या पोटी झाला. २७ जुलै २०२५ रोजी लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात आईने ह्या बाळाला जन्म दिला. सिझेरियन सेक्शन किंवा एपिसिओटॉमी न करता बाळाचा सुरक्षित जन्म झाला.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्याकडून रुग्णालयाच्या चमूला सतत प्रेरणा मिळते. श्री. बी. प्रभाकरन ह्यांचा या प्रदेशात दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यावर विशेष भर आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालक सुश्री. कीर्ती रेड्डी यांचेही एलकेएएम रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूला मार्गदर्शन आणि पाठबळ असते.
आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. एलकेएएम रुग्णालयामधील डॉक्टरांच्या मते, ‘शोल्डर डायस्टोसिया’ (बाळंतपणात गर्भाचा खांदा मातेच्या श्रोणिमध्ये अडकणे, ज्यामुळे बाळाला बाहेर येण्यास अडचणी निर्माण होतात) परिस्थिती असतानाही रुग्णालयाच्या तज्ञ चमूने प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली. ह्यातून माता व बाळ सेवेतील उत्कृष्टतेसाठी रुग्णालयाची वचनबद्धता अधोरेखित होते तसेच गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता दर्शवते. सदर बाळाचा जन्म गडचिरोली भागातील सर्वात अधिक वजनाच्या बाळाच्या सामान्य प्रसूतीद्वारे झालेल्या जन्मांपैकी एक असू शकतो.
0 Comments