उदय धकाते यांच्या हस्ते कारगिल स्मारक येथे ध्वजारोहण



गडचिरोली : शहरातील कारगील चौक येथील स्मारक येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. 
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ च्यावतीने  79 व्या
स्वातंत्र्य दिनांनिमित्याने ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री गुरुदेव प्राथमिक शाळा, राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी यांनी देशाभक्ती गीतावर सुंदर सादरीकरण केले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक सुनील देशमुख, डॉ. नरेश बिडकर, भाऊराव कोडापे, प्रकाश धकाते, रुपेश सलामे,तुषार निकुरे,महादेव कांबळे, रामा हजारे,दिलीप भारसागडे, पुरुषोत्तम शेंडे निलिमा देशमुख, प्रमिला कुंभारे,मुख्याध्यापिका मीरा मडावी, वनिता भांडेकर आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments