गडचिरोलीत “तिरंगा सायकल यात्रा”ने निर्माण केला देशभक्तीचा उत्साह



तीनशे सायकलस्वारांचा सहभाग 

गडचिरोली ः प्रदूषणमुक्त भारताचा संदेश आणि विद्यार्थ्यांमधील जनजागृतीचा हेतू घेऊन सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी भर पावसात भव्य “तिरंगा सायकल यात्रा” आयोजित काढण्यात आली. या यात्रेमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. या उपक्रमाचे  आयोजन मंडळाचे जिल्हा सचिव उदय धकाते यांनी केले. 

यात्रेचा शुभारंभ इंदिरा चौकातून नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आला.भर पावसात निघालेली ही तिरंगा सायकल रॅली ठरविलेल्या मार्गानुसार यात्रा — इंदिरा चौक → पटेल सायकल स्टोअर्स → आठवडी बाजार → कारगिल चौक →  इंदिरा चौकातील विश्रामगृहात  पार पडली.

या उपक्रमात वसंत विद्यालय, महिला महाविद्यालय, विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, राणी दुर्गावती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अशा विविध शाळा-महाविद्यालयांतील सुमारे ३०० विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. याशिवाय अनेक सायकल प्रेमींनीही देशभक्तीचा उत्साह वाढवला.

समारोप कार्यक्रमास गडचिरोली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले, “तिरंगा सायकल रॅलीने शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले आहे. मी स्वतः दररोज सकाळी व रात्री शहरात सायकलवरून गस्त घालून कायदा व सुरक्षेची पाहणी करतो. भविष्यात प्रत्येक शाळेत वाहतूक नियम व शिस्तीबाबत जनजागृतीसाठी पोलीस विभाग पूर्ण सहकार्य करेल.”

या वेळी प्राचार्य योगेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायकल स्नेही मंडळाचे सायकल स्नेही मंडळाचे अध्यक्ष प्रा. विलास पारखी तिरंगा यात्रेचे आयोजक सचिव उदय धकाते, उपाध्यक्ष उपेंद्र रोहनकर, प्रा. सुनीता साळवे, सहसचिव योगिता दशमुखे, विजय साळवे,  उपेंद्र रोहणकर,मुख्याध्यापिका सुचिता कामडी,मीरा बिसेनआर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक अमोल दशमुखे,बबलू शर्मा, सतीश धाईत, प्रभाकर मंदूरकर, विनायक साळवे, पुरुषोत्तम ठाकरे,प्रा.ज्ञानेश्वर धकाते,.मीरा बिसेन. शिल्पा कोहळे,नगर परिषदेचे अभियंता अंकुश भालेराव, गणेश ठाकरे, गणेश नाईक, रेवणनाथ गाडगे, प्रेमप्रकाश वासेकर, गुरुदेव बालेकरमकर, मोरेश्वर पेंदाम, कौस्तुभ रोकमवार, शशी गजभिये, शुभम रंगारी  व इतर कर्मचारी उपस्थित होते.. सायकल स्नेही - हिरालाल भाजीपाले, हरिदास कोटरंगे, प्राचार्य डॉ.योगेश पाटील,प्रा.डाॅ.कुंदन दुफारे,प्रा.हितेश चरडे, प्रा.सुरेश कांती,प्रा.शेखर गडसूलवार, यांनी सहकार्य केले.

या उपक्रमासाठी पोलीस विभाग आणि नगर परिषद, गडचिरोली यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विजय साळवे यांनी केले.


Post a Comment

0 Comments