योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वात भाजपा महिला आघाडीकडून कॉंग्रेस पक्षाचा जाहीर निषेध

 
गडचिरोली :  जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात भारतीय जनता पार्टी (भाजपा) महिला आघाडीच्या वतीने कॉंग्रेस पक्षाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. बिहार निवडणुकीच्या मुद्यावरून समाजात विष पेरून मातृशक्तीचा अपमान केल्याचा आरोप करत, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वाखाली धानोरा बाजार चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात बोलताना सौ. योगिताताई पिपरे यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, "राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाची विचारधारा नेहमीच समाजात विष पेरणारी आणि नारीशक्तीचा अपमान करणारी राहिली आहे. पंतप्रधान पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे आणि अश्लील चित्र रेखाटणे हा देशातील मातृशक्तीचा घोर अपमान आहे. देशातील मातृशक्ति कॉंग्रेसचे हे विषारी वर्तन कधीही सहन करणार नाही.
या निषेध आंदोलनात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री अर्चनाताई बोरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष कविताताई उरकुडे, जिल्हा सचिव अर्चनाताई चन्नावार, तालुका अध्यक्ष  भुमाला परचाके, जिल्हा पदाधिकारी  रोशनी बानमारे, वर्षा कन्नाके यांच्यासह अनेक महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
या आंदोलनाद्वारे भाजपा महिला आघाडीने कॉंग्रेस पक्षाच्या कथित मातृशक्ती अपमानाच्या मुद्यावर तीव्र आक्षेप नोंदवत आपला संताप व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments