भाजपा महिला आघाडीची धानोरा येथे बैठक: सेवा पंधरवड्याचे नियोजन आणि संघटन बळकटीकरणावर चर्चा


धानोरा : भारतीय जनता पार्टी (भाजपा) महिला आघाडीच्या वतीने धानोरा तालुक्यातील आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात शनिवारी (दि. 13/09/2025) एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत संघटनात्मक कामकाज, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष, गडचिरोली नगर परिषद, सौ. योगिता पिपरे यांनी उपस्थित महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "प्रत्येक बूथवर महिला आघाडीने सक्रियपणे काम करावे आणि पक्षाच्या ध्येयधोरणांना गती द्यावी." तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबर ते गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यात ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीला भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव  रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री  अर्चनाताई बोरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष  कविताताई उरकुडे, जिल्हा सचिव अर्चनाताई चन्नावार, धानोरा तालुका अध्यक्ष भुमाला परचाके,  रोशनीताई बानमारे,. वर्षाताई कन्नाके, संजना कोमेटी, आशा ताई कुमेटी, ज्योती कोटगले, माया गुरनुले, कुसुम चिंचोलकर, पौर्णिमा गेडाम यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या बैठकीत स्थानिक प्रश्नांचा आढावा घेण्यात आला आणि आगामी काळात पक्षाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांवरही चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी उत्साहाने सेवा पंधरवड्याच्या यशस्वी आयोजनासाठी कटिबद्धता दर्शवली.

Post a Comment

0 Comments