गडचिरोली : शहरातील गोकुळनगर बायपास रोड परिसरातील इच्छापूर्ती शिव-साई-नाग मंदिर (डॉ. मलिक यांच्या दवाखान्यामागे) येथे श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. २४ जून ते २७ जून २०२६ या कालावधीत विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री दादाश्री बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली, श्री दादाश्री बहुउद्देशीय महिला बचत गट, गडचिरोली, मानवता पथ भक्ती गुरुमार्ग (महाराष्ट्र) तसेच समस्त मानवता पथ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महादेव मंदिराचे लोकार्पण तसेच शिवलिंग आणि नागदेवता यांच्या मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा
२४ जून (बुधवार)
सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ७ या वेळेत देवपूजन, जलाधिवास, पुष्पाधिवास, धृताधिवास, हवनपूजन आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
२५ जून (गुरुवार)
सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ७ या सत्रात देवपूजन, धान्याधिवास, मिष्ठान्नाधिवास, औषध्याधिवास, हवनपूजन व आरती होणार आहे.
२६ जून (शुक्रवार)
सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ७ या वेळेत देवपूजन, वस्त्राधिवास, धूपाधिवास, शय्याधिवास, हवनपूजन आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ जून (शनिवार)
सोहळ्याच्या मुख्य दिवशी सकाळी ९ वाजता मूर्ती स्थापना, अभिषेक, श्रृंगार दर्शन आणि पूर्णाहुती आरती संपन्न होणार आहे. त्यानंतर वृद्धाश्रमात भोजनदान करण्यात येणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
या धार्मिक महोत्सवात गडचिरोली शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments