अवैध जुगारावर पोलिसांची मोठी कारवाई; 37 आरोपींवर गुन्हा

 
गडचिरोली :  कोरची तालुक्यातील पोलीस मदत केंद्र बेडगाव हद्दीतील गहाणेगाठा जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगारावर पोलिसांनी धाड टाकून 31 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 22 चारचाकी, 6 दुचाकी, 26 मोबाईल फोन, 75 हजार 10 रुपये रोख व जुगार साहित्य असा एकूण 1 कोटी 34 लाख 14 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
18 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या आरोपींसह पसार झालेल्या आरोपींविरुद्ध कोरची पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 37 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. दिनेश खोटेले व पोलीस पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments