नाल्यात पडून इसमाचा मृत्यू



कोरची : तालुक्यातील कोटगुल नजीकच्या नाल्यात पडून सायकलस्वार इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. धरमु पुडो (65) रा. पिटेसुर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरची तालुका मुख्यालयापासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिटेसुर येथील धरमु पुडो हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कोटगुल वरून ढोलडोंगरीकडे सायकलने जात होता. दरम्यान कोटगुल नजीकच्या शिवनाथ नाल्यावरील पुलावर अचानक त्याच्या सायकलची चेन पडल्याने धरमु पुडो हा नाल्यात कोसळला. सदर नाला कोरडा असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. पुडोचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणण्यात आला. याप्रकरणाची कोरची पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास  पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुरज पवार हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments