गडचिरोलीत विविध संघटना उतरल्या रस्त्यावरत्या' प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी
गडचिरोली : देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार दूर करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्फतीने शासनाला पाठविण्यात आले.
आंदोलनादरम्यान रोहिदास राऊत, भारत येरमे, मुनिश्वर बोरकर, कुसुम अलाम, गुलाबराव मडावी, वसंत कुलसंगे, मनोहर हेपट, विलास निंबोरकर, प्रकाश अर्जुनवार, विजय गोरडवार, राज बसोड, भोजराज कानेकर, प्रदिप भैसारे आदींनी आपल्या भाषणातून अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला. या धरणे आंदोलनात जनार्धन ताकसांडे, प्रमोद राऊत, माजिद भाई, हंसराज उंदीरवाडे, सुरेखा बारसागडे, जयश्री येरमे, पुरुषोत्तम रामटेके, अशोक खोब्रागडे, प्रल्हाद रायपुरे, अपर्णा खेवले प्रतिक डांगे, नरेद्र रायपूरे, नीता सहारे, ज्योती उंदीरवाडे, वनमाला झाडे, जयश्री येरमे नंदकिशोर भैसारे, साईनाथ पुंगाटी, केशव सामुतवार, भिमराव शेन्डे, अनिल बारसागडे, आनंद कंगाले, शुकदेव वासनिक, प्रदीप कुलसंगे, सुनिता उसेंडी, पुनम भैसारे, माला पुडो आदींसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
............... 
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या 
भारताच्या संसेदवरील लावलेली विद्रुप स्वरूपातील राजमुद्रा त्वरीत बदलविण्यात यावी, विल्किस बानो बलत्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करावी, राजस्थान मधील मेघवाल नामक एका दलित विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या शिक्षकास फाशीची शिक्षा झाली पाहीजे, झारखंड मधील सुनिता खाखा या आदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या सीमा पात्रा या बिजेपीच्या महिला नेत्यावर कडक कारवाई करावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. 
...........
आंदोलनात सहभागी संघटना 
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात जन अधिकार मंच, आदिवासी एकता युवा मंच, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विचार मंच, ऑल ईंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडेरशन, जमाते इस्लामी हिंद, बीआरएसपी, अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी, पिरीपा, भारत मुक्ती मोर्चा, बाबुराव मडावी स्मारक समिती, गोंडवाना गोटुल समिती, रिपब्लिकन महिला आघाडी, नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, काँग्रेस अनु.जाती महिला सेल यांच्यासह इतर पक्ष व संघटनांनी सहभाग नोंदविला होता.

Post a Comment

0 Comments