पारंपरिक चिकित्सेला संशोधनाची जोड ; डॉ. एम. एन. सूर्यवंशी lokpravahगडचिरोली : विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान  संसाधन केंद्रा द्वारे सुरू करण्यात आलेल्या वैद्य चिकित्सालयाचे कौतुक करीत पारंपरिक चिकित्सा पद्धतीला पुढे नेण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत राहू असे आश्वासन देत पारंपारिक चिकित्स्याला संशोधनाची जोड देऊन त्याला उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन प्रभारी सहाय्यक निदेशक (आयु) आर. ए. आर.  आय. , नागपूर, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद , आयुष मंत्रालय, भारत सरकार डॉ. एम. एन. सूर्यवंशी यांनी केले. ते विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकताच वैद्य चिकित्सालय या अभिनव उपक्रमाचा सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. 

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, कार्यकारी मंडळ विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. सी. डी मायी,  राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान, महाराष्ट्र शासन, नागपूर केंद्राचे सल्लागार व कार्यालय प्रमुख प्रगती गोखले, मुख्य कार्यक्रमाधिकारी व  प्रमुख विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ आशिस घराई, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, पारंपारिक उपचार करणाऱ्या वेदूंना एक व्यासपीठ मिळावे व पारंपारिक चिकित्सा पद्धतीला वाव मिळवा या हेतूने तसेच आयुर्वेदिक उपचारांचा लाभ सर्वसामान्य लोकांना घेता येईल या दृष्टिकोनातून वैद्य चिकित्सालय निर्माण करण्यात आले असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष कार्यकारी मंडळ विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र डॉ. सी.डी.माई यांनी उपस्थित सर्व वेदूंचे आभार मानले व औषधी वनस्पतींना बाजारपेठेत चांगली किंमत आहे व मागणी सुद्धा आहे त्या दृष्टिकोनातून शेती सोबतच औषधी वनस्पती  लागवड करण्याचा प्रयत्न करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे वनस्पतींचे संवर्धन पण होईल असे ते म्हणाले. 

 प्रास्ताविकात मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र आशिस घराई म्हणाले, गडचिरोली जिल्हा औषधी गुणधर्म असणाऱ्या विविध वनस्पतींनी संपन्न असून याच उद्देशाने 2019 रोजी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, प्रयागराज यांच्या अर्थसाह्य निधीतून स्वदेशी औषधी ज्ञानाचा दस्ताऐवजी करण करायला सुरुवात केली , त्याचाच एक भाग म्हणून तसेच कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून वैद्य चिकित्सालयाची सुरुवात करत आहोत असे ते म्हणाले .

कार्यक्रमाचे आभार आशिस घराई यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील वैदुंची मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Post a Comment

0 Comments