प्रभाग समन्वयकाचे झालेले स्थलांतरण रद्द करा; अन्यथा सामूहिक राजीनामे lokpravah.com

 महिला संघाचा इशारा



कूरखेडा :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियाना अंतर्गत तळेगाव- वडेगाव प्रभागात प्रभाग समन्वयक म्हणून मागील ९ वर्षापासून कार्यरत भुपेंद्र करोडकर यांची यावर्षी येथून आरमोरी येथे स्थातंरण करण्यात आले त्यांचा स्थालंतरणाचा फटका अभियानाचा कामावर होत कामाची गती मंदावलेली आहे त्यामूळे त्यांचे स्थलांतरण रद्द करीत पूर्ववत ठिकाणी नेमणूक करण्यात यावी अन्यथा अभियाना अंतर्गत या प्रभागात कार्यरत ग्रामसंघ प्रभागसंघ पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा गट विकास अधिकारी धिरज पाटील यांचाकडे निवेदना द्वारे देण्यात आला आहे

       शासन महिला सक्षमीकरणा करीता अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. उपक्रमाची सक्षमपणे अंमलबजावणी होण्याकरीता अभियाना अंतर्गत स्वंयसेवक कार्यरत असतात. तळेगाव- वडेगाव प्रभागात प्रभाग समन्वयक म्हणून मागील ९ वर्षापासून भूपेंद्र करोडकर कार्यरत होते. त्यांचे सक्षमपणे नियोजन बद्ध व समन्वयाने करण्यात येत असलेल्या कामाने या प्रभागात अभियानाची यशस्वी अलबजावणी सूरू होती. मात्र, यावर्षी त्यांची अचानक आरमोरी तालूक्यात बदली झाल्याने अभियानात अव्यवस्था निर्माण होत, गती मंदावलेली आहे. यापूर्वी बदली रद्द करण्याबाबत जिल्हा अभियान व्यवस्थापक गडचिरोली यांचाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, कार्यवाही शून्य असल्याने या प्रभागात कार्यरत महिलानी पंचायत समिती कार्यालयावर धडक देत बदली रद्द न झाल्यास अभियानाची कामे थांबवत सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 

निवेदन देताना माजी पं स सदस्य चांगदेव फाये‌, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, प्रभागसंघ अध्यक्ष मंदा नंदेश्वर, सचिव अनूरता कोरेटी, दिपा सहारे, सूशीला चौधरी, दिपाली सहारे , दूर्गा चव्हाण, उज्वला ठलाल, फिरोजा शेख, प्रियंका राऊत, सूमन मडावी , वनीता भांडारकर, गिता ताराम, दिलेश्वरी उईके, सूनिता चव्हाण, वंदना मडावी, शेवंता हलामी, अंजली जांभूळकर, शशीकला सहारे उपस्थीत होते .

Post a Comment

0 Comments