नवयुवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजे नवयुवक मंडळ : आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन lokpravah.com

सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ शिरपूरच्यावतीने  सामाजिक संदेश देणा-या कार्यक्रमांची रेलचेलकुरखेडा : सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ शिरपूर हे गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध सामाजिक उपक्रम राबवून गावच्या अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून सार्वजनिक नवयुग दुर्गा उत्सव मंडळ हे गावातील युवक युवती महिला वर्ग पुरुष वर्ग व बालगोपाल यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देणारे मंडळ म्हणजे नवयुवक दुर्गोत्सव मंडळ होय असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले ते सार्वजनिक नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ  शिरपूर यांच्या वतीने आयोजित समारोपीय कार्यक्रम, बक्षीस वितरण व माहेर भेट सत्कार सोहळा या प्रसंगी उद्घाटन स्थळावरून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव भाऊ फाये तर उद्घाटक आमदार कृष्णा गजबे हे होते  सहउद्घाटक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रविंद्र गोटेफोडे, सत्कारमूर्ती विश्वनाथ बसोड, प्रमिला बनसोड, तर प्रमूख अतिथी दिलीप  आहुजा, प्रा. विनोद नागपूरकर, सिडाम सर, सरपंच कुरेशाताई मडावी ग्रामसेवक सहारे , खालील भाई शेख, नरेश खुणे,चरणदास आडे नरेंद्रजी पटणे , झूरे सर, राकेश खुणे, पोलीस पाटील विश्वनाथ जी रामटेके भाविकाताई दुमाने उपस्थित होते यावेळी यावेळी मंडळाच्या वतीने 2022 मध्ये लग्न झालेल्या नववधू साठी सासर भेट व माहेर भेट म्हणुन भेट वस्तू देण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी चांगदेव फाये, रविंद्र गोटेफोडे, व विश्वनाथ बनसोड,  यांनी आपल्या मार्गदर्शनातून नवयुवक दुर्गोत्सव मंडळचे कार्याचे भरभरून कौतुक करून पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरपूर व देवूलगाव येतील महिला वर्ग व युवतीनी गरबा नृत्य सादर केले .

कार्यक्रमाचे संचालन सुखदेव सर यांनी केले तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष आर,डी, बावनथडे यांनी  तर आभार सुकदेवें सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments