पक्ष संघटनेसाठी जिल्ह्यातील महिलांचे योगदान महत्त्वाचे lokpravah.com

माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन


भाजपच्या जिल्हा महिला मेळाव्याला  शहरातील व आदिवासी दुर्गम भागातील महिलांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

 गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आदिवासी भागातील महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून व शेतीची कामे पाहून दुर्गम भागातील आदिवासी महिलांना न्याय देण्यासाठी व त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी व सरसकट लाभ देणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत, हे खरोखरच वाखण्याजोगे आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या विकसित व सुसंस्कृत भारत, सुजलाम सुफलाम भारत व गरीब शोषित पीडित लोकांच्या कल्याणासाठी व त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड यांची जाण ठेवून व त्यांच्या स्वच्छ सुंदर व विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदिवासी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला लोकहितासाठी व सर्वदूर पसरलेल्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. हे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे. पक्ष संघटन वाढवण्यासाठी त्यांचे गेल्या कित्येक वर्षे पासून सुरू असलेले काम व त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच आज नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता असून अनेक आमदार खासदार तथा राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे.

त्यामुळेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र काम करणाऱ्या महिलांनी पक्षासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष तथा महिला आघाडी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका माननीय योगिताताई पिपरे यांनी केले. नुकताच सुमानंद सभागृहात आयोजित जिल्हा महिला मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.


कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चित्राताई वाघ या प्रामुख्याने उपस्थित होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिप अध्यक्ष माननीय योगीताताई भांडेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडीचे जिल्हा महामंत्री अर्चनाताई ढोरे वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव गिताताई हिंगे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा जिल्हा संपर्कप्रमुख सदानंदजी कुथे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, प्रदेश कार्यकारणी सदस्य रेखाताई डोळस, माजी जी प सदस्य तथा धानोरा तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटे, भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा युवती प्रमुख प्रीतिताई शंभरकर, तालुकाध्यक्ष संगीता ताई रेवतकर वडसाच्या माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे ,महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी जिप सभापती सुनिताताई पारधी , गडचिरोच्या तालुकाध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे शामोर्शीच्या तालुका अध्यक्ष माधवीताई पेशट्टीवार, कुरखेडा च्या तालुकाध्यक्ष जयश्रीताई मडावी , अहेरीच्या तालुकाध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार , कोरचीच्या तालुकाध्यक्ष नीलकमल मोहूरले मुलचेराच्या तालुका अध्यक्ष प्रभाती भक्त, वडसा तालुक्याच्या तालुकाध्यक्ष रेवताताई अलोणी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन पुष्पाताई गझळवार, यांनी तर प्रास्ताविक महिला आघाडीच्या  जिल्हाध्यक्ष  तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष योगीताताई भांडेकर यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार जिल्हा सचिव गीता ताई हिंगे यांनी मानले. मेळाव्याच्या उत्कृष्ट  तयारीसाठी व मेळावा यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष कविताताई उरकुडे , माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, लताताई लाटकर, नीताताई उंदिरवाडे,  अर्चनाताई निम्बोड, कोमल बारसागडे , पायलताई कोडापे ,भावनाताई हजारे रश्मीताई बाणमारे, पूनम हेमके व शहरातील महिला पदाधिकांनी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments