भारत जोडो यात्रेत सहभागा करीता कांग्रेस कार्यकर्त्यांचा जत्था रवाना lokpravah.comकूरखेडा : खा राहूल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकूमारी येथून निघालेल्या भारत जोडो यात्रेचे आगमन महाराष्ट्रत झाले आहे. या यात्रेत सहभागा करीता कुरखेडा तालूक्यातून कांग्रेस कार्यकर्त्यांचा जत्था आज बूधवार रोजी येथून पातूर जि अकोला करीता रवाना झाला.
अखील भारतीय कांग्रेस पक्षाच्या वतीने खा राहूल गांधी यांच्या नेतृत्वात दि ७ सप्टेबंर रोजी कन्याकूमारी येथून काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा १५० दिवसात १२ राज्यातून ३ हजार ५७० कीलोमीटर अंतर पदक्राँत करीत जम्मू-कश्मीर राज्यात पोहचणार आहे सध्या ही यात्रा राज्यातील अकोला जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा जत्था गूरूवार रोजी यात्रेत सहभागी होणार आहे. येथून ४९ कीलोमीटर अंतर पदयात्रेत सहभागी होत शेगाव येथील जनसभेत उपस्थीत राहत कार्यकर्ते माघारी फीरणार आहेत. पदयात्रेत सहभागी होण्याकरीता तालुका कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, तालुका महिला कांग्रेस अध्यक्ष आशाताई तूलावी, माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी, माजी प स सभापति गिरीधर तितराम, माजी सभापति संध्या नैताम, तूकाराम मारगाये, प्रतिभा सिडाम, कूसूम ठलाल, संगीता मडावी व कांग्रेस कार्यकर्ते रवाना झाले आहे .

Post a Comment

0 Comments