कुरखेडा : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोज बुधवारला लेखिका संगीता ठलाल यांचेकडून शाळेला दिवाळी अंक २०२२ व दीपस्तंभ या दोन पुस्तके शाळेला भेट दिली . सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांसमोर सौ.संगीता ठलाल यांनी शाळेचे मुख्याध्यापक ए.एम.गेडाम यांचेकडे वितरीत केले . त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक ए.एम.गेडाम यांनी सौ.संगीता ठलाल यांच्या लेखनाबद्दल कौतुक केले तसेच शाळेला पुस्तके दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले . म्हणाले की या पुस्तकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल . सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक ए.एम.गेडाम , शाळेचे पर्यवेक्षक सी.एस.मुंगमोडे कवियेत्री सौ.संगीता ठलाल , शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
0 Comments