लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन तर्फे जागतिक बांबू दिवस साजरा



गडचिरोली ,:  लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड लोह खनिज खाण च्या लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन तर्फे मौजा नेंडेर, सुरजागड, नागुलवाडी व कारमपल्ली येथे जागतिक बांबू दिवस च्या निमित्ताने बांबू ची  रोपे लावून जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आले. तसेच बांबू पासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू व त्यांच्या विक्री करुन कश्या प्रकारे आर्थिक नफा होईल याबाबत माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावकऱ्यांनी लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन च्या अधिकारी व कर्मचा-याचा आनंदाने सहकार्य केले.

 जागतिक बांबू दिन दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा विशेष दिवस बांबूशी संबंधित फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि दैनंदिन उत्पादनांमध्ये त्याचा वापर वाढवण्यासाठी साजरा केला जातो. बांबू आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. बऱ्याच काळापासून बांबू कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरला जात आहे. जसे फर्निचर किंवा पिशव्या, कपडे  इत्यादी.

बांबूविषयी अनेक रंजक गोष्टी आहेत. बांबूची काठी किती ठणक असली तरी बांबू ही गवतवर्गीय वनस्पती आहे. बाबूंचा गवत वर्गामध्ये समावेश होतो. बांबू ही एक प्रकारची नैसर्गिक वनस्पती असून त्याचे वैज्ञानिक नाव Bambusidae आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

जागतिक बांबू दिनानिमित्त लोकांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या गवत वनस्पतींमध्ये बांबूचे नाव अग्रस्थानी आहे. ज्याचा उपयोग फर्निचर, खाद्यपदार्थ, इंधन, कपडे अशा अनेक गोष्टींमध्ये होतो. मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी बांबूची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. दक्षिण पूर्व आशियाई, पूर्व आशियाई देश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये बांबूचा सर्वाधिक वापर केला जातो.

Post a Comment

0 Comments