जेडियू (जनता दल युनायटेड ) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मंगेश कामडी यांची नियुक्ती
डचिरोली :  जेडियू (जनता दल युनायटेड ) पक्षाची बैठक  सोमवार (ता. १८)  शासकिय विश्राम गृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीत जेडियू (जनता दल युनायटेड ) पक्षाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी मंगेश  कामडी यांची नियुक्ती करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी जेडियुचे प्रदेश सचिव उमेश उईके हे होते तर प्रमुख उपस्थिती जेडियुचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष गोकुलदास झोडगे हे होते. यावेळी जेडियूची गडचिरोली जिल्हा, तालु‌का व शहर कार्यकारणी गठीत करण्यात आली. जिल्हा महासचिव म्हणून मोहन रामदास दिवटे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश उध्दव कामडी, तालुका अध्यक्ष. जाविद सूर्यभान उदिरवाडे, शहर अध्यक्ष प्रितम बेंडूजी साखरे तसेच तालुका उपाध्यक्ष बाळा लाडवे, शहर उपाध्यक्ष सचिन मेश्राम शहर सचिव जितेंद्रसिंग गौतम, शहर सहसचिव छोटू पठान, आदि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली बैठकिला, प्रदेश सचिव उमेश उईके, जिल्हाध्यक्ष गोकुलदास झोडगे, मंगेश कामडी, प्रितम साखरे, मोहन दिवटे, जाविद उंदिरवाडे, बाळा लाडवे, सचिन मेश्राम, जितेंद्रसिंग गौतम, छोटू पठान, बबलू पठान, अलिअल खान, खेवले, संजय कोटरंगे, विनोद जरुरकर, गणेश ठाकरेसह  कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments