Gadchiroli युवकाची हत्या; दोघांना अटक
गडचिरोली : आलापल्ली येथील गोंड मोहल्ला वॉर्ड क्रमांक ४ मध्ये रविवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक तरुण मृतावस्थेत आढळून आला होता ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. डोके व अंगावरील जखमांवरून या तरुणाचा खून झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. अहेरी पोलिसांनी या प्रकरणात चौकशीचे चक्र फिरवून या प्रकरनात अहेरी पोलिसांनी रविवारी एका महिला व पुरुषाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती अहेरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी दिली आहे.

राकेश फुलचंद कन्नाके (३५, रा. वॉर्ड क्रमांक १. श्रमिकनगर, आलापल्ली) असे मृत तरुणाचे नाव आहे. आलापल्लीच्या गोंड मोहल्ल्यात दिवंगत डॉ. किशोर नैताम यांच्या मालकीचे खुले पटांगण आहे. याच परिसरात दिलीप तोडासे यांचे घर आहे. घराच्या बाजूला रविवारी सकाळी राकेश कन्नाके याचा मृतदेह चिखलाने माखलेल्या स्थितीत आढळला. ही माहिती मिळताच राकेशची पत्नी, आई, भाऊ व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राकेशच्या कपाळाला, डाव्या डोळ्यावर गंभीर खोल जखम होती. तसेच चेहरा, नाकावर जखम होती. एक पाय मोडलेला होता. शिवाय अंगावर काही जखमा होत्या. त्यामुळे राकेशचा खूनच झाला असावा, अशी शंका वर्तविली जात होती
याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीमसुद्धा दाखल झाली. श्वान पथक आणून व परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज ची सुद्धा पोलिसांनी तपासणी केली होतीदरम्यान, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलिस निरीक्षक संतोष मरस्कोल्हे, पोलिस अंमलदार संजय चव्हाण, पोलिस हवालदार किशोर बांबोळे आदीं या घटनेचाअधिक तपास करीत आहेत.

अनैतिक संबंधातून वादावादी होऊन राकेशची हत्या झाल्याचा संशय असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments