कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा : दोन लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्‍त




गडचिरोली ः गडचिरोली उपविभागांतर्गत येत असलेल्‍या पोलिस ठाणे रेगडी हद्दीतील पोतेपल्‍ली रै. येथील कोंबड बाजारावर गडचिरोली पोलिसांनी रविवार (27 जुलै) छापा टाकून कोंबड्यांच्‍या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन लाख 24 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. 

सविस्तर वृत्त असे आहे की, रविवार दिनांक 27 जुलै रोजी उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणा­या पोस्टे रेगडी हद्दीतील मौजा पोतेपल्ली रै येथील गावालगतच्या जंगलात काही इसम कोंबड्यांची  झंुज लावून त्यावर जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे रेगडीचे पोउपनि. कुणाल इंगळे व पोलीस पथकाने मौजा पोतेपल्ली रै गावाजवळील जंगलात जाऊन सापळा रचला असता, काही इसम हे कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांनी केलेल्या धाडी दरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच जुगार खेळणा­यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला होता. मात्र सदर कारवाई दरम्यान पोलीसांनी पांडुरंग चिन्ना तिम्मा, वय 57 वर्षे,  ऋषी महारु तिम्मा, वय 60 वर्षे, महेंद्र हिरामण कुलेटी वय 27 वर्षे, विजय रामजी कुलेटी, वय 50 वर्षे, चौघेही रा. पोतेपल्ली रै, ता. चामोर्शी जि. गडचिरोली, करण कार्तीक बिश्वास, वय 34 वर्षे, रा. शिमुलतला 75 ता. चामोर्शी जि. गडचिरोली, व शामल मथ्ुरा अहीरवार, वय 35 वर्षे, रा. महाकाली वार्ड नं. 12, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 1) काळ्या-पांढ­या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर - अंदाजे किंमत 40,000/- रु. 2) हिरो स्प्लेंडर प्रो - अंदाजे किंमत 70,000/- रु. 3) काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस - अंदाजे किंमत 70,000/- रु., 4) काळ्या रंगाची हिरो होंडा सीडी 100 - अंदाजे किंमत 10,000/- रु., 5) काळ्या रंगाची अॅक्टीवा स्कुटी - अंदाजे किंमत 20,000/- रु. 6) रोख रक्कम 11,770/- रु., 7) 3 नग झुंजीचे कोंबडे - अंदाजे किंमत 2,180/- रु. व 10) तीन काती (लोखंडी)- अंदाजे किंमत 150/- रु. अशा वर्णनाचा एकूण 2,24,100/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. यावरुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने नमूद सहा आरोपींवर पोस्टे रेगडी येथे अप क्र. 18/2025 कलम 12 (ब) महा. जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्राचा पुढील तपास सफौ. मधुकर सुर्यवंशी हे करीत आहेत.

जिल्ह्रातील काही दुर्गम व ग्रामीण भागात कोंबडा बाजार भरविला जात असतो. असे अवैध कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झंुजींवर पैंज लावून जुगार खेळणा­यांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील प्रभारी अधिकारी यांना दिलेे आहे. आदेशाची अंमलबजावणी करीत रविवारी 27 जुलैला  उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणा­या पोस्टे रेगडी हद्दीतील मौजा पोतेपल्ली रै येथे अवैधपणे कोंबड्यांचा बाजार भरवून झुंजींवर जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींवर गडचिरोली पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. या कारवाईत 2 लाख 24 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे रेगडीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. कुणाल इंगळे, नापोअं/मालु पंुगाटी, पोअं/सचिन निमगळे, शिवा आडे, जितेंद्र बोलीवार, गुलशन आत्राम, संदिप खेडकर, सुनिल गेडाम, आशिष सोनमनवार, सुनिल मडावी, विवेक घोडीचोर यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments