गडचिरोली नगर परिषदेच्‍या तिरंगा विक्री व वितरण उपक्रमाला नागरिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

 


 कार्यालय व आठवडी बाजार परिसरात झेंडे वितरणासाठी उपलब्ध

 गडचिरोली  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाने सन २०२२ पासून सुरू केलेल्या "हर घर तिरंगा" मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा, यासाठी नगर परिषद गडचिरोलीतर्फे तिरंगा विक्री व वितरण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 नगर परिषदेने यासाठी ६,००० झेंडे उपलब्ध करून दिले असून, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत तेजस्वी शहर उपजीविका केंद्र मार्फत गाळा क्र. २६, २७, आठवडी बाजार व कारगिल चौक येथे नागरिकांना झेंड्यांचे वितारण केले जात आहे. याशिवाय नगर परिषद कार्यालयात तसेच राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत नोंदणीकृत बचत गटांच्या माध्यमातूनही झेंड्यांचे वितरण सुरू आहे. नगर परिषदेतर्फे घरोघरी ध्वज वितरणाची विशेष मोहीम देखील राबविण्यात येत आहे.


"हर घर तिरंगा" मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना जागवावी, तसेच राष्ट्रीय ऐक्य व अभिमानाचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments