गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी आमदार डॉक्टर नरोटे यांची महत्त्वपूर्ण चर्चा


 गडचिरोली : जिल्ह्यातील रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्यासोबत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या उभारणी प्रकल्पांसह रिंग रोडच्या कामाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी दर्जेदार रस्ते नेटवर्क महत्त्वाचे असल्याचे डॉ. नरोटे यांनी सांगितले. "जिल्ह्यातील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी हे प्रकल्प अत्यावश्यक आहेत. यामुळे वाहतूक सुलभ होईल आणि स्थानिक नागरिकांना थेट फायदा मिळेल," असे ते म्हणाले. या चर्चेमुळे गडचिरोलीकरांच्या दीर्घकाळाच्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते  अनंत साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा सचिव  सारंग साळवे, तालुका महामंत्री सुभाष धाईत,  संजय कुंडू,  बाळूभाऊ उंदीरवाडे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments