गडचिरोली : गडचिरोलीपासून जवळच असलेल्या पुलखल गावात आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका ५५ वर्षीय महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मृतक महिलेचे नाव ललिता देवराव गेडेकर असे आहे. ललिता या निंदन काढण्यासाठी शेतात गेल्या असताना ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
0 Comments