प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल आत्मसमर्पीत माओवादी सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल
गडचिरोली : आत्मसमर्पण केलेल्या एकूण 12 माओवादी सदस्यांपैकी पती-पत्नी असलेले अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश तानू हिचामी, डिव्हीसीएम, राही दलम व केंद्रिय समिती सदस्य सोनु ऊर्फ भूपती याचा बॉडिगार्ड, वय 32 वर्षे, रा. झुरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली आणि त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) वय 25 वर्षे, रा. बेरेलटोला, तह. पाखाजूर, जि. नारायणपूर (छ.ग.) यांनी देखील आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पणानंतर या दाम्पत्यास सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य जगणे शक्य झाले होते, जे दलममध्ये कार्यरत असताना त्यांना शक्य नव्हते. आज रोजी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी हिची जिल्हा महिला सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे प्रसुती होऊन त्यांना मूल प्राप्त झाल्याने या दाम्पत्याच्या जीवनाला नवी दिशा मिळणार आहे
एक जानेवारी 2025 रोजी अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश तानू हिचामी (डिव्हीसीएम राही दलम) व त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) यांनी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांचे समोर आत्मसमर्पण केले होते.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 783 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सर्वकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल होणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजिवनीच्या माध्यमातून आरोग्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण, रोजगार इ. विविध सुविधा आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना गडचिरोली पोलीस दलाकडून दिल्या जात असतात. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल करून घेण्यासाठी राबविण्यात येणाया विविध उपक्रमांची फलश्रुती म्हणून सन 2025 या वर्षात आतापर्यंत एकूण 101 माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
एक जानेवारी 2025 रोजी वरिष्ठ डिकेएसझेडसिएम तारक्का सह या अन्य 10 माओवादी सदस्यांनी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केलेल्या एकूण 12 माओवादी सदस्यांपैकी पती-पत्नी असलेले अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश तानू हिचामी, डिव्हीसीएम, राही दलम व केंद्रिय समिती सदस्य सोनु ऊर्फ भूपती याचा बॉडिगार्ड, वय 32 वर्षे, रा. झुरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली आणि त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) वय 25 वर्षे, रा. बेरेलटोला, तह. पाखाजूर, जि. नारायणपूर (छ.ग.) यांनी देखील आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पणानंतर या दाम्पत्यास सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य जगणे शक्य झाले होते, जे दलममध्ये कार्यरत असताना त्यांना शक्य नव्हते. आज रोजी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी हिची जिल्हा महिला सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे प्रसुती होऊन त्यांना मूल प्राप्त झाल्याने या दाम्पत्याच्या जीवनाला नवी दिशा मिळणार आहे. या माओवादी दाम्पत्यास गडचिरोली पोलीस दलातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येऊन त्यांना सर्व सामान्य कौंटूबिक आयुष्य जगता यावे यासाठी विविध कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना लाभ देण्यात आला. यामध्ये त्यांची वैयक्तिक ओळख म्हणून आधार कार्ड, पैन कार्ड यासारखे ओळखपत्र बनवून देण्यात आले. तसेच त्यांना स्वावलंबी आयुष्य जगता यावे यासाठी त्यांना बैंक अकाऊंट, इ-श्रम कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सचा लाभ देखील मिळवून देण्यात आला. या दाम्पत्यास केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी एकत्रितपणे 16.3 लाख रुपये निधी मिळवून देण्यात आला आहे. या सर्वाच्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना हिसक भूतकाळाला मागे मोडत शांतीपूर्ण आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळत आहे. अर्जुन व सम्मी यांना पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्याकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



0 Comments