श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
गडचिरोली : सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पतसंस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांचा सक्रिय सहभाग, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार आवश्यक असून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उद्योग सहकारी संस्था उभारून उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणेचे संचालक तथा गडचिरोली नगरपरिषदेचे माजी सभापती इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.
श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., गडचिरोलीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २० सप्टेंबर रोजी श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, आरमोरी रोड येथे उत्साहात पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून इंजि. प्रमोदजी पिपरे उपस्थित होते. त्यांनी सभासदांना सहकार क्षेत्राची भूमिका, संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांचे योगदान तसेच आर्थिक शिस्त व पारदर्शक कारभाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत संताजी जगनाळे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. प्रणोतीताई निंबोरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्री संताजी प्रतिष्ठानचे सचिव सुरेश भांडेकर, श्री नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष भय्याजी सोमणकर, उपाध्यक्ष राजेंद्र भुरसे, संचालक विजय भांडेकर, गजानन बारसागडे, प्रवर्तक रघुनाथजी भांडेकर, रमेश बोधलकर यांच्यासह पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने इंजि. प्रमोद पिपरे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पतसंस्थेला आर्थिक देणगी देणाऱ्या देणगीदारांचा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्री संताजींचे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन संचालिका शिलाताई सोमणकर यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष राजेंद्रजी भुरसे यांनी मानले.


0 Comments